Wednesday, 19 February 2014

मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा

निवडणूक आयोग; गैरसोय टाळण्यासाठी मतदारजागृतीचा कार्यक्रम


मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना निवडणुकीपूर्वी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे.
मतदारांच्या दुबार पाहणीत 50 लाख मतदारांची नावे बनावट असल्याचे आढळल्याने याद्यांचे फेरनिरीक्षण करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर यादीतून नाव गळाले असल्यास प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदारांनी आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात जाऊन यादीत आपले नाव आहे का ते तपासावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी केले आहे.
आयोगाने मतदारजागृतीचा कार्यक्रमही हाती घेतला असून, मतदार यादीत नावे नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी नव्याने अर्ज करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

- सकाळ वृत्तसेवा

Wednesday, February 19, 2014 AT 11:23 AM (IST)